आज दिनांक०५/०६/२०२५रोज गुरुवार ला वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली र. न. ३१८ च्या "१८व्या वर्धापन दिनानिमित्य" संस्थेच्या अध्यक्ष्यामा.श्रीमती गीताताई वि. बोरकुटे,उपाध्यक्षमा.कु. चेतना वि. ठाकुर व मा. सौ. उषा बि. खोये यांचे हस्ते दीप प्रज्वलन व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .
संस्थेची स्थापना दिनांक ०५/०६/२००७ ला झाली असून सतत उतोरोक्त प्रगती होत आहे . संचालक मंडळ व पदाधिकारी,अभिकर्ता, कर्मचारी, यांचे मोलाचे योगदान आहे. संस्थेच्या प्रगती चा वाढता आलेख पाहून उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार सन २०१६द्वितीय क्रमांका साठी निवड झाली होती. तसेच सण २०२१ च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २७/०२/२०२२ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सण २०२२च्या कामाचे अवलोकन केले असता, सन २०२३द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सण २०२३च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २५/०२/२०२४ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सण २०२४च्या कामाचे अवलोकन केले असता, दिनांक २३/०२/२०२५ ला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ‘‘ उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार २०२४-२५ ’’ करीता संचालक मंडळ समिती व्दारा संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचायांच्या कामाचे मुल्यांकन आणि कार्यानुभव क्षमता यावरून उत्कृष्ठ कर्मचारी म्हणुन प्रफुल अशोक राऊत यांना प्रथम, तृप्ती राजेंद्र सालोटकर यांना द्वितीय, कांचन शालिक बटे यांना तृतीय क्रमांकासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘‘ उत्कृष्ठ अभिकर्ता पुरस्कार २०२४-२५ ’’ करीता संस्थेत कार्यरत असलेल्या अभिकर्त्याच्या कामाचे मुल्यांकन आणि कार्यानुभव क्षमता, खाते वाढ यावरून उत्कृष्ठ अभिकर्ता म्हणुन संगीता रवी मोहूर्ले यांना प्रथम, दीपक मारोती रोडे यांना द्वितीय, विठ्ठल किरमे यांना तृतीय क्रमांकासाठी परितोषित देऊन व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच संस्थेचे मार्गदर्शक तथा तज्ञसंचालक मा.श्री. बि. आर. खोये यांनी कर्मचारी व अभिकर्ता यांना मोलाचे मार्गदर्शन केले व अशा रितीने वर्धापण दिनाच्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्यात आले.